IND vs SL 1st T20: टीम इंडिया 2023 मधील पहिली मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. 3 जानेवारीपासून दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या जर्सीत (Team India Jursey) मोठा बदल करण्यात आला आहे. या मालिकेत टीम इंडिया एका नव्या टायटल स्पॉन्सरसोबत मैदानात उतरणार आहे, ज्याचे फोटोही समोर आले आहेत. दरम्यान, टीम इंडियाच्या जर्सीवर एमपीएलचा (MPL) लोगो बराच काळ दिसत होता, मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाच्या जर्सीवरून एमपीएलचा लोगो हटवण्यात आला आहे. भारतीय संघाच्या जर्सीचा टायटल स्पॉन्सर आता एमपीएलऐवजी किलर ब्रँड (A killer Brand) बनला आहे. टीम इंडिया आता किलर ब्रँडच्या लोगोची जर्सी घेऊन मैदानात उतरणार आहे.
पहा फोटो
Fantastic five ?
All set for the T20I series ??#TeamIndia | #INDvSL pic.twitter.com/pAWq28wkF7
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) January 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)