IND vs SL 3rd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना (IND vs SL 3rd ODI) बुधवारी (7 ऑगस्ट) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिला सामना बरोबरीत सुटला, तर दुसरा सामना श्रीलंकेने 32 धावांनी जिंकला. आता रोहितसेनेकडे मालिका वाचवण्याचे लक्ष असणार आहे तर दुसरीकडे श्रीलंकेला भारताला पराभूत करुन इतिहास रचण्याची सुवर्ण संधी आहे. दरम्यान, श्रीलंकाने टाॅस जिकून फलंगाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने संघात दोन बदल केले असुन रियान परागने वनडेमध्ये पदार्पण केले आहे.

दोघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंदू मेंडिस, दुनिथ वेलालागे, महिष थिकशना, जेफ्री वांडर्से आणि असिथा फेरनांडो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)