टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात आज तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. हा सामना गकेबरहा शहरातील सेंट जॉर्ज पोर्क येथे खेळला जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. अशा स्थितीत आता उर्वरित दोन सामने जिंकणारा संघच मालिकेवर कब्जा करेल. अशा स्थितीत प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल. या मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या हाती आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग-11
भारत : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका : मॅथ्यू ब्रिट्झके, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, अँडिले फेहलुकवायो, जेराल्ड कोएत्झी, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी.
🚨 Toss Update 🚨
South Africa have elected to bowl against #TeamIndia in the second #SAvIND T20I.
Follow the Match 👉 https://t.co/4DtSrebAgI pic.twitter.com/4UFl7rCNLF
— BCCI (@BCCI) December 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)