IND vs ENG 5th Test: इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटला बाद करण्यासाठी बॅकवर्ड डायव्हिंग झेल घेत भारतीय फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) पुन्हा एकदा आपली प्रतिभा दाखवली. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी, 18व्या षटकातील सहाव्या चेंडूवर, भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने चेंडू टाकला, जो डकेटने लेग साइडला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू हवेत गेला आणि इंग्लिश सलामीवीराने चुकीचा फटका खेळला. कव्हर परिसरात उभ्या असलेल्या गिलला मागे वळून सुमारे 20 यार्ड अंतरापर्यंत पळाला आणि डाईव्ह टाकून आश्चर्यचकित झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG 5th Test: रोहित शर्माला आठवला ऋषभ पंत, इंग्लिश फलंदाजाच्या विधानाला दिले चोख प्रत्युत्तर (Watch Video)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)