India National Cricket Team vs Pakistan National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना रविवारी म्हणजे 23 फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs PAK) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळला जात आहे. हा ग्रुप अ चा तिसरा सामना आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवान यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाचा सौद शकीलने 63 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे त्याचे चौथे अर्धशतक आहे. पाकिस्तानचा स्कोर 141/2
Saud Shakeel brings up his fourth ODI fifty! 🇵🇰🔥
A solid, watchful knock from the Pakistan left-hander on a difficult pitch 🙌
Can he continue his momentum and get a big score? 🤔#SaudShakeel #PAKvIND #ChampionsTrophy #Sportskeeda pic.twitter.com/rFKTjfqGpo
— Sportskeeda (@Sportskeeda) February 23, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)