IND vs ENG 3rd Test: इंग्लंडविरुद्ध राजकोट येथे होणाऱ्या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. टीम इंडियाने सरफराज खानला (Sarfaraz Khan) संधी दिली आहे. सरफराज पदार्पण कसोटी सामना खेळणार आहे. नाणेफेकीपूर्वी त्याला भारतीय संघाची कॅप देण्यात आली. सरफराज कॅपसह स्टेडियममध्ये उभ्या असलेल्या आई आणि वडिलांकडे पोहोचला. टीम इंडियाची कॅप पाहून सरफराजच्या वडिलांना अश्रू आवरता आले नाहीत. त्याची आईही भावूक झाली. सरफराजचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. आता तो आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.
I hope Sarfaraz Khan scores a century.pic.twitter.com/FXARZUINc2
— . (@Pushpa__07) February 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)