क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) एकदिवसीय क्रिकेटमध्ये आजच्या दिवशीच 2010 साली पहिलं द्विशतक (Double Century In ODI) झळकावलं होतं. ग्वाल्हेरमध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (South Africa) मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सचिनने नाबाद 200 धावांची अप्रतिम खेळी केली होती.टीम इंडियानं या सामन्यात 3 विकेट गमावून 401 धावा केल्या होत्या.या सामन्यात सचिनने 147 चेंडूमध्ये 25 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीन एकदिवसीय सामन्यातले पहिले द्विशतक झळकावले होते. या सामन्यात सचिनने दाखवून दिले होते की एकदिवसीय सामन्यात ही 200 धावांची इनिंग खेळली जाऊ शकते.

पहा व्हिडीयो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)