पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) अनुभवी फलंदाज 40 मोहम्मद हाफीजने (Mohammad Hafeez) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वांडरर्स स्टेडियमवर (Wanderers Stadium) पहिल्या टी-20 सामन्यासाठी मैदानावर पॉल ठेवताच एका मोठ्या विक्रमला गवसणी घातली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हाफीजचा आंतरराष्ट्रीय टी-20 करिअरमधील हा 100वा सामना ठरला आहे. पाकिस्तानकडून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची शंभरी गाठणारा दुसरा खेळाडू तर जगातील सहावा क्रिकेटर ठरला आहे. पाकिस्तानसाठी आजवर सर्वाधिक टी-20 सामने खेळण्याचा रेकॉर्ड शोएब मलिकच्या (Shoaib Malik) नावावर आहे ज्याने 116 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
The PCB congratulates @MHafeez22 on his 100th T20I#SAvPAK #HarHaalMainCricket #BackTheBoysInGreen pic.twitter.com/ayDSQkwVie
— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)