IND vs PAK Champions Trophy 2025: रोहित शर्माने (Rohit Sharma) पाकिस्तानविरुद्ध एक उत्तम कामगिरी केली. दुबईच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात, रोहित एकदिवसीय स्वरूपात सलामीवीर म्हणून सर्वात जलद 9 हजार धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे. त्याने अनेक दिग्गज खेळांडूना मागे सोडले आहेत. रोहितने क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला आहे. केवळ भारतासाठीच नाही तर रोहित शर्मा हा सलामीवीर म्हणून एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 9,000 धावा पूर्ण करणारा खेळाडूही बनला आहे. त्याने 181 डावांमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या. तर सचिन तेंडुलकरने 179 डावांमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात जलद 9 हजार धावा पूर्ण केल्या. यादीत तिसऱ्या स्थानावर सौरव गांगुली आहे, ज्याने 231 डावांमध्ये ही कामगिरी केली. 246 डावांसह ख्रिस गेल चौथ्या स्थानावर आहे.
FASTEST TO COMPLETE 9000 RUNS AS AN OPENER IN ODIs:
Rohit Sharma - 181 innings
Sachin Tendulkar - 197 innings pic.twitter.com/XXx7yyvS9V
— Johns. (@CricCrazyJohns) February 23, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)