Rohit Sharma has the Most Sixes as a Captain: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केली. रोहितने सात चौकार आणि तीन षटकाराच्या जोरावर 58 धावा करुन बाद झाला. यानंतर रोहित शर्माच्या नावावर विश्वविक्रम नोंदवला गेला. रोहितने तीन षटकार ठोकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार बनला आहे. या मोठ्या विक्रमानंतर त्याने आपल्या कर्णधारांना मागे टाकून तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारांची यादी:

  1. रोहित शर्मा- 234 षटकार
  2. इऑन मॉर्गन- 233 षटकार
  3. महेंद्रसिंग धोनी- 211 षटकार
  4. रिकी पाँटिंग- 171 षटकार
  5. ब्रेंडन मॅक्युलम- 170 षटकार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)