वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final 2023) 7 ते 11 जून दरम्यान द ओव्हल, लंडन येथे खेळवला जाईल. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची घोषणा (IND vs AUS) करण्यात आली आहे. या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपली प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. गेल्या वेळी भारतीय संघ डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला तेव्हा शास्त्री संघाचे प्रशिक्षक होते.

WTC फायनलसाठी शास्त्रीची प्लेइंग इलेव्हन: शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, केएस भरत (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)