RCB vs PBKS Match, IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 34 वा सामना शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात आयोजित करण्यात आला आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने क्रीकेट चाहत्यांना मोठे नाराज केले. बेंगळुरूमध्ये पावसामुळे टॉसही वेळेत होऊ शकला नाही. आता पाऊस थांबला आहे. यामुळे नाणेफेक लवकरच होऊ शकते. सध्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ग्राउंड स्टाफकडून मैदान खेळण्यासाठी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे उशीरा पण सामना सुरू होण्याची शक्यता आहे. गुणतालीकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे आणि पंजाब संघ चौथ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी 6-6 सामने खेळले आहेत आणि 4-4 असे जिंकले आहेत.

पाऊस थांबला! सामना लवकरच सुरू होण्याची शक्यता

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)