IPL 2025 CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्सकडून पराभव पत्करावा लागला. ज्यामुळे ते आयपीएलमधून बाहेर गेले आहेत. पंजाबच्या (CSK vs PBKS) विजयात कॅप्टन श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंह यांनी अर्धशतके झळकावली. मात्र, स्लो ओव्हर रेटमुळे श्रेयस अय्यरला दंड (Shreyas Iyer fined Rs 12 lakh)ठोठावण्यात आला. या विजयामुळे पंजाब गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या सीएसकेला पंजाबने 190 धावांवर ऑल आऊट केले. त्यानंतर पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंह यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने 4 विकेटने विजय मिळवला. बुधवारी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सामन्यात स्लो ओव्हर रेट (Slow Over-rate) राखल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. निर्धारित वेळेत 20 षटके पूर्ण न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या हंगामातील पंजाबची ही पहिलीच चूक असल्यामुळे फक्त कर्णधाराला शिक्षा झाली आहे. आता येत्या सामन्यांमध्ये ही चूक पुन्हा झाल्यास संपूर्ण टीमला दंड भरावा लागू शकतो. या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला 4 विकेट्सने हरवले. आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांसंबंधी, त्याच्या टीमचा हा पहिला गुन्हा असल्यामुळे अय्यरला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)