आजच्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव केला. या पराभवाने आयपीएलमधील पंजाब किंग्जचा प्रवास इथेच संपला आहे. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर पंजाब किंग्ज संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि 20 षटकात 5 गडी गमावून 187 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून सॅम करनने सर्वाधिक नाबाद 49 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून नवदीप सैनीने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने 19.4 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. राजस्थान रॉयल्सकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. पंजाब किंग्जकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.  राहुल चहरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 3 चेंडूत 5 धावांची गरज असताना ध्रुव जुरेलने षटकार मारत राजस्थानला हा सामना जिंकवला.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)