Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 2nd Test: बांगलादेशचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. बांगलादेशने मालिकेतील पहिली कसोटी 10 गडी राखून जिंकली. मालिकेतील दुसरी कसोटी 30 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी पाकिस्तानने 12 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे या संघात वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीला स्थान देण्यात आलेले नाही. तर लेगस्पिनर अबरार अहमदला या सामन्यासाठी परत बोलावण्यात आले आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानचे 12 खेळाडू: शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), अबरार अहमद, मोहम्मद अली, सलमान अली आगा, सैम अयुब, बाबर आझम, मीर हमजा, मोहम्मद रिझवान, अब्दुल्ला शफीक, नसीम शाह, खुर्रम शहजाद

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)