PAK vs NEP: आजपासून 16व्या आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेला सुरुवात होत आहे. वनडे फॉरमॅटची ही 14 वी आवृत्ती आहे. यावेळी या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे (Pakistan) आहे. पाकिस्तानमध्ये 4 सामने खेळवले जाणार आहेत, तर 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत ज्यात भारताच्या सर्व सामन्यांचा समावेश आहे. या स्पर्धेचा सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ (PAK vs NEP) यांच्यात होणार आहे. हा सामना मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतातील आशिया कपचे मीडिया हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. टीव्हीवर, प्रेक्षकांना वेगवेगळ्या भाषांमधील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर याचा आनंद घेता येईल. तर ओटीटी वर, चाहत्यांना हॉटस्टारवर आशिया कपचे सर्व सामने पाहता येतील. यासोबतच तुम्हाला जिओ सिनेमावर भारतातील सामन्यांचे मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. आशिया चषकाचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होतील. टॉसची वेळ दुपारी 2.30 वाजता असणार आहे.
Ready. Steady. Asia Cup! 🔥
The quest to conquer the Asian Glory begins with a star studded #Pakistan taking on a spirited #Nepal! 💪🏻
Tune-in to #PAKvNEP on #AsiaCupOnStar
Today | 2 PM | Star Sports Network#Cricket pic.twitter.com/MGWvZbyd5P
— Star Sports (@StarSportsIndia) August 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)