भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात सुरु आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. टीम इंडिया या मॅचची सुरुवात विजयाच्या दिशेने करू इच्छित आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू झाली आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अनेक वाहिन्यांवर पाहता येईल. याशिवाय डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हॉटस्टारचे सदस्यत्व असलेले वापरकर्ते ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
Hello from Nagpur 👋
It's the opening Day of what promises to be a cracking Border-Gavaskar Trophy 👌 👌
How excited are you❓#TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/vaUpEL7Jrw
— BCCI (@BCCI) February 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)