ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक 2023 च्या मोहिमेत आणखी एक अडथळा आला आहे कारण स्टार अष्टपैलू मिचेल मार्श वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला आहे. यासह मार्श इंग्लंडविरुद्धच्या (AUS vs ENG) सामन्यातूनही बाहेर आहे. मार्श पर्थला रवाना झाला असून शनिवारी अहमदाबादमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार नाही. सोमवारी गोल्फ दिवसादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे ग्लेन मॅक्सवेल स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर ही बाब समोर आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी एका निवेदनात पुष्टी केली की मार्श बुधवारी रात्री घरी परतला होता. (हे देखील वाचा: ICC Cricket World Cup 2023: रोहित शर्माला मिळाला स्वार्थी होण्याचा सल्ला, उत्तर ऐकून तुम्ही व्हाल थक्क)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)