IND vs IRE: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) आठव्या सामन्यात आज भारताचा सामना अ गटात आयर्लंडशी (IND vs IRE) होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा या आवृत्तीतील हा पहिला सामना आहे आणि रोहित शर्मा आणि कंपनीला या स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे. तथापि, आयर्लंड अपसेट खेचण्यात पटाईत आहे आणि टीम इंडियाला त्यांच्यापासून दूर राहावे लागेल. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजीसाठी आयर्लंडलाचा संघांने भारतासमोर 97 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आयर्लंडकडून डेलेनीने सर्वाधिक धावा केल्या तर भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
India's pacers run through Ireland on a tough pitch for batters #INDvIRE
👉 https://t.co/VtCUDP0JO7 pic.twitter.com/dCCWvlrOMx
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)