दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) क्रिकेट संघ सध्या आयर्लंडच्या (Ireland) दौर्‍यावर आहे. दोन्ही संघात तीन सामन्यांची वनडे सामन्यांची आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जात असून मालिकेचा पहिला सामना पावसाने धुऊन काढला, तर दुसर्‍या सामन्यात आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेला 43 धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवत क्रिकेटविश्वाला चकित केले. आयर्लंडने दिलेल्या 291 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात आफ्रिकी संघ 247 धावाच करू शकला परिणामी संघाला 43 धावांनी पराभव पत्करावा लागला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)