इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) साठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 19 डिसेंबर आज दुबई (Dubai) येथे खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे. आयपीएलचा लिलाव भारताबाहेर परदेशात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयपीएल 2024 स्पर्धेचा लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईत पार पडणार आहे. हा लिलाव स्थानिक वेळेनूसार सकाळी 11:30 वाजता सुरु होईल. तर भारतीय वेळेनूसार दुपारी 1 वाजता सुरु होईल.  आयपीएल 2024 स्पर्धेचा लिलाव स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर जियो सिनेमावर तुम्ही हा लिलाव फ्रीमध्ये पाहू शकता. हा लिलाव तुम्ही www.jiocinema.com वर लाईव्ह पाहु शकता. (हेही वाचा - IPL 2024 Auction Live Streaming Online: तुम्ही येथे आयपीएलचा लिलाव पाहू शकता विनामूल्य, वेळ आणि स्ट्रीमिंग बद्दल जाणून घ्या सर्वकाही)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)