IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात आयपीएलचा 33 वा सामना आज नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने नाणेफेक जिंकली आणि मुंबईला पहिले फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे. मुंबईच्या ‘पलटन’ आणि चेन्नईच्या XI मध्ये या सामन्यासाठी काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.मुंबईकडून रिले मेरेडिथ (Riley Meredith) आणि हृतिक शोकीन (Hrithik Shokeen) यांनी आयपीएल पदार्पण केले आहे. तसेच डॅनियल सॅम्स (Daniel Sams) देखील मुंबईच्या XI मध्ये परतला आहे. दुसरीकडे, चेन्नई प्लेइंग इलेव्हनमध्ये मोईन अली (Moeen Ali) आणि ख्रिस जॉर्डनच्या जागी मिचेल सँटनर आणि ड्वेन प्रिटोरियस (Dwaine Pretorius) यांचा समावेश झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)