2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा सलग चौथा पराभव झाला आहे. रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाचवा विजय नोंदवला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 1 विकेटने जिंकला. या सामन्यात प्रथम खेळताना पाकिस्तानचा संघ 270 धावांवरच मर्यादित राहिला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने 47.2 षटकांत 9 गडी गमावून लक्ष्य गाठले. आज नशीब पाकिस्तानच्या बाजूने नव्हते आणि 46 व्या षटकात हरिस रौफच्या गोलंदाजीवर पंचांनी कॉल केल्याने दक्षिण आफ्रिकेचा बचाव झाला. पाकिस्तानचा पराभव आणि दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे टीम इंडियाचे नुकसान झाले आहे. भारतीय संघ आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. मात्र, भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी 10 गुण आहेत. पण आफ्रिकेचा नेट रन रेट खूप चांगला आहे. तर न्यूझीलंड तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे. श्रीलंका पाचव्या तर पाकिस्तान सहाव्या स्थानावर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)