IND vs SL 1st T20I: भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20I Series) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-20 सामना शनिवारी (27 जुलै) पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तत्तपुर्वी, श्रीलंकेने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने श्रीलंकेसमोर 214 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून यशस्वी जैस्वाल 40, सूर्यकुमार यादव 58 आणि ऋषभ पंत 49 सर्वाधिक धावा केल्या. तर श्रीलंकाकडून माथेशा पाथीराणाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला श्रीलंकाचा संघ 19.2 षटकात गारद झाला. श्रीलंकेसाठी सलामीवीर पथुम निसांकाने 79 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून रियान परागने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील दुसरा टी-20 सामना उद्या संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे.
1ST T20I. India Won by 43 Run(s) https://t.co/Ccm4ubmWnj #SLvIND #1stT20I
— BCCI (@BCCI) July 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)