IND vs ZIM T20 Series: टी-20 विश्वचषक 2024 संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी भारतीय संघ झिम्बाब्वेला भेट देणार आहे. 6 जुलै ते 14 जुलै दरम्यान दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान, बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केला आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच, भारतीय संघाची कमान शुभमन गिलकडे देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी पहिल्यांदाच नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, रियान पराग आणि तुषार देशपांडे यांचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. हे सर्व खेळाडू प्रथमच भारतीय संघात सामील झाले आहेत.

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवि, बिश्नोयी. आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)