IND vs ENG T20 WC 2024 Semi-Final 2: टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. सुपर-8 च्या महत्त्वाच्या सामन्यात कांगारूंना पराभूत केल्यानंतर आता टीम इंडिया उपांत्य फेरीत ब्रिटीशांशी लढत आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अफगाणिस्तानचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. म्हणजेच आजचा विजयी संघ 29 जून रोजी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. तत्तपुर्वी, इंग्लंडने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 171 धावा केल्या आहे. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 57 धावा केल्या. दुसरीकडे, इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटाकात 172 धावा करायच्या आहेत. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला पहिला धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 26/1
Axar strikes with his first ball - the huge wicket of Buttler! https://t.co/sZqQjHaSVm | #INDvENG | #T20WorldCup pic.twitter.com/Es0aUhfN5X
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)