IND W vs NZ W World Cup 2022: पूजा वस्त्रकर हीचा अचूक थ्रो आणि न्यूझीलंडची Suzie Bates सरळ तंबूत परत, पहा व्हिडिओ

IND vs NZ Women's World Cup 2022: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी महिला विश्वचषकचा 8 वा सामना हॅमिल्टन येथे सुरु झाला आहे. डावाच्या तिसऱ्याच षटकात यजमान संघाने सुझी बेट्स हिची विकेट गमावली. पूजा वस्त्रकर हिच्या अचूक थेट थ्रोसमोर सुझीचा वेग मंदावला आणि व्हाईट फर्न्स फलंदाज स्वस्तात माघारी परतली.

IND W vs NZ W World Cup 2022: पूजा वस्त्रकर हीचा अचूक थ्रो आणि न्यूझीलंडची Suzie Bates सरळ तंबूत परत, पहा व्हिडिओ
पूजा वस्त्रकर (Photo Credit: Twitter/BCCIWomen)

IND vs NZ Women's World Cup 2022: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात आयसीसी महिला विश्वचषकचा (Women's World Cup) 8 वा सामना हॅमिल्टन (Hamilton) येथे सुरु झाला आहे. भारतीय कर्णधार मिताली राज हिने नाणेफेक जिंकून किवी संघाला पहिले फलंदाजीला बोलावले. अशा परिस्थितीत कर्णधार सोफी डिव्हाईन आणि सुझी बेट्स (Suzie Bates) यांनी डावाची सुरुवात केली. पण सामन्याच्या तिसऱ्या षटकात बेट्सला पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) हिच्या अचूक थेट थ्रो मुळे स्वस्तात तंबूत परतावे लागले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2022 08:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).