IND vs SL 1st T20I: श्रीलंका (Sri Lanka) विरोधात लखनऊ येथे सुरु असलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात यजमान टीम इंडियाने (Team India) निर्धारित षटकांत आपल्या ताबडतोड फलंदाजीच्या जोरावर दोन बाद 199 धावांचा डोंगर उभारला आहे. आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी अचूक 200 धावांचे लक्ष ठेवले. भारतासाठी सलामीवीर ईशान किशनने (Ishan Kishan) 89 धावांची तुफान खेळी केली तर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) नाबाद 57 धावा ठोकल्या. तसेच कर्णधार रोहित शर्माने 44 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, पाहुण्या संघाला मैदानात बेफिकीरपणा चांगलाच भोवला. गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करत राहिले तर खेळाडूंनी हातात आलेली संधी देखील गमावली. लाहिरु कुमारा आणि दासुन शनाका यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
Shreyas Iyer's half-century helps India end up with a total of 199/2 in their 20 overs 🔢
Can Sri Lanka chase this down? #INDvSL | 📝 https://t.co/YXIT9WrBeI pic.twitter.com/h4UPPQwKNP
— ICC (@ICC) February 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)