आजच्या भारत विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक 2022 सामन्याच्या सुरुवातीला मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतीय राष्ट्रगीत, 'जन गण मन' वाजवण्यात आले. यावेळी मैदानामध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनी उभे राहून एकत्र हे राष्ट्रगीत गायले. या राष्ट्रगीताचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले. 'आपणा सर्वांच्या अंगावर शहारा आणणारे राष्ट्रगीत आणि आपल्या सगळ्यांच्या मनामनात वसलेला आपला देश.'
दरम्यान, आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला. सुपर-12 फेरीतील गट-2 मधील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडिया आपल्या गटात दोन गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. आता 27 ऑक्टोबरला भारतीय संघ आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सशी भिडणार आहे.
आपणा सर्वांच्या अंगावर शहारा आणणारे राष्ट्रगीत आणि आपल्या सगळ्यांच्या मनामनात वसलेला आपला देश.#JaiHind #TeamIndia #IndVsPak2022
VC: @prashantsin pic.twitter.com/WeXp72ieQ2
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) October 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)