IND W vs NZ W World Cup 2022: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात आयसीसी महिला विश्वचषक (Women's World Cup) 2022 चा 8 वा सामना हॅमिल्टन  (Hamilton) येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून सुझी बेट्सच्या (Suzie Bates) रूपात भारताला पहिली विकेट मिळाली. पूजाने शानदार धावबाद करत भारताला हे यश मिळवून दिले. तर त्यानंतर पूजा वस्त्राकरने आपल्या पहिल्याच षटकात व्हाईट फर्न्स कर्णधार सोफी डिव्हाईनला (Sophie Devine) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)