India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 23 षटकांत तीन गडी गमावून 81 धावा केल्या होत्या. दरम्यान, तिसऱ्या दिवशी भारताने दुसरा डाव चार विकेट गमावून 287 धावांवर घोषित केला आहे. तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा दुसरा डाव संकटात सापडला आहे. अश्विनने बांगलादेशला तीन झटके दिले असून मुशफिकूर हा बांगलादेशचा चौथा फलंदाज बाद झाला आहे. बांगलादेशची सध्या धावसंख्या 158 वर 4 बाद
पाहा पोस्ट -
Wicket no.3 for @ashwinravi99 👏👏
Mushfiqur Rahim departs, courtesy a fine catch by @klrahul.
Live - https://t.co/jV4wK7BgV2… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/Gp79wUjMEk
— BCCI (@BCCI) September 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)