इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 55 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने 11 सामने खेळले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सने 10 सामने खेळले आहेत. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्ज 6 सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्स फक्त 4 विजय मिळवून गुणतालिकेत तळाशी म्हणजे 10 व्या स्थानावर आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 167 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून शिवम दुबेने सर्वाधिक 25 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल मार्शने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकात 168 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला पाचवा मोठा धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्कोअर 97/5.
Match 55. 15.3: Matheesha Pathirana to Axar Patel 4 runs, Delhi Capitals 96/5 https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)