आगामी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ऑगस्टमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया कपमध्ये पुनरागमन करू शकतात. आशिया कप 2023 ची तारीख जाहीर झाली आहे. यावेळी आशिया चषक केवळ पाकिस्तानातच नाही तर श्रीलंकेतही खेळवला जाणार आहे. आशिया चषक 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. 4 सामने पाकिस्तानात आणि 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. पीसीबीने आशिया कपसाठी हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला होता. श्रीलंका हे तटस्थ ठिकाण आहे जिथे भारत आपले सामने खेळेल. भारत-पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत.
Jasprit Bumrah and Shreyas Iyer are aiming to make a comeback in the 2023 Asia Cup. (Reported by Espncricinfo). pic.twitter.com/2GJOpoQ3ox
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)