भारतात खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन (Shaheen Afridi) आफ्रिदीने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. त्याने शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशासोबत दुसरं लग्न केलं आहे. या शानदार सोहळ्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमही दिसला, त्याने सर्व तक्रारी विसरून शाहीनला मिठी मारून शुभेच्छा दिल्या. गेल्या आठवड्यात, पाकिस्तान संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये बाबर आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात तणावाचे वृत्त समोर आले होते. यानंतर 14 सप्टेंबर रोजी आशिया चषकाच्या सुपर 4 सामन्यात श्रीलंकेविरुद्धचा पराभव झाला, ज्यामुळे ते बाहेर पडले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)