IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना ढाका येथे खेळला जात आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 314 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर 87 धावांची आघाडी घेतली. आज तिसऱ्या दिवशी खेळाला सुरवात झाल्यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशने चौथा झटका लागला आहे. मुशफिकर रहीम 9 धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला. बांगलादेशचा स्कोअर 70/4 आहे.
2ND Test. WICKET! 31.1: Mushfiqur Rahim 9(19) lbw Axar Patel, Bangladesh 70/4 https://t.co/CrrjGfXPgL #BANvIND
— BCCI (@BCCI) December 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)