SRH vs PBKS, IPL 2024: आज आयपीएल 2024 च्या 23व्या (IPL 2024) सामन्यात पंजाब किंग्जचा सामना सनरायझर्स हैदराबादशी (PBKS vs SRH) होत आहे. दोन्ही संघांमधला हा सामना चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब आणि हैदराबादने त्यांचे मागील सामने जिंकले असून दोन्ही संघ विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, पंजाबने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना हैदराबादने पंजाबसमोर धावांचे 182 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सनरायझर्स हैदराबादचा युवा फलंदाज नितीश रेड्डीच्या 37 चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 64 धावांची खेळी केली. पंजाबकडून अर्शदीप सिंगने चार, तर सॅम कुरन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबला दुसरा चौथा लागला आहे. 60/4
A stunning catch from captain Pat Cummins brings an end to Sam Curran's innings 👏👏#PBKS require 117 runs in 10 overs.
Follow the Match ▶ https://t.co/JP3mpkETgx #TATAIPL | #PBKSvSRH pic.twitter.com/Nw5oIilC83
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)