Fake T20 World Cup Trophy! भारतीय क्रिकेट चाहते टी-20 विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करत आहेत. तब्बल 17 वर्षानंतर ही ट्रॉफी भारतामध्ये परत आली आहे. आज संध्याकाळी मुंबईमध्ये टीम इंडियाची विजय यात्रा काढण्यात आली. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयने भारतीय संघाला 125 कोटींचा चेक सुपूर्त केला. जेव्हापासून भारतीय संघ भारतामध्ये परत आला तेव्हापासून भारतीयांच्या नजरा त्या विजयी ट्रॉफीवर आहेत. परेडदरम्यानही खुल्या बसमध्ये भारतीय संघाचे सर्व खेळाडू विश्वचषक ट्रॉफी मिरवताना दिसले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे टीम इंडिया मिरवत असलेली ही वर्ल्डकप ट्रॉफी खरी नाही.
बऱ्याच काळापासून चालत असलेली ही एक प्रथा आहे, ज्यामध्ये विजेत्या संघाला अंतिम सामन्यानंतर केवळ फोटो काढण्यासाठी खरी ट्रॉफी दिली जाते. मात्र त्यानंतर संघाला आपल्या देशात परतताना विश्वचषक ट्रॉफीची प्रतिकृती दिली जाते. ही प्रतिकृती ट्रॉफी मूळ विश्वचषक ट्रॉफीसारखीच असते. खरी ट्रॉफी फक्त फोटो सेशनसाठी दाखवली जाते आणि नंतर ती दुबईतील आयसीसी मुख्यालयात परत पाठवली जाते. (हेही वाचा: Rohit Sharma With Trophy: मोठ्या प्रेमाने रोहित शर्मा ट्रॉफी साफ करताना आला दिसून, व्हिडिओ होतोय व्हायरल)
पहा पोस्ट-
बारबाडोस से 'नकली' ट्रॉफी लेकर क्यों आई टीम इंडिया, कहां है असली वर्ल्ड कप? जानें इसके पीछे की वजह
.
.
.#TeamIndia #teamindiaparade #T20WorldCup #T20WorldCup2024 #t20worldcuptrophy #cricket #barbados #mumbai #parade #marinedrivehttps://t.co/3rpaNEO9q0
— Republic Bharat - रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) July 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)