IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवार 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. बुधवारी एक दिवस आधी, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग 11 जाहीर केला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन पहिल्या कसोटीत खेळणार नाही. संघात समाविष्ट असलेल्या दोन्ही यष्टिरक्षकांचा इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. आता जॉनी बेअरस्टो की बेन फॉक्स यष्टिरक्षण ग्लोव्हज घालून दिसणार हे पाहायचे आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा प्लेइंग 11:

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जॅक लीच.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)