फलंदाजांनंतर गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला. संजू सॅमसनची 86 धावांची महत्त्वपूर्ण खेळी व्यर्थ गेली. त्याच पहिल्या डावात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला 222 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य दिले होते. जेक फ्रेझर-मॅकगर्क (50), अभिषेक पोरेल (65), ट्रिस्टन स्टब्स (41) यांनी तुफानी खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आयपीएल 2024 मधील 56 क्रमांकाचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 8 गडी गमावून 221 धावा जोडल्या. ज्यामध्ये ट्रेंट बोल्ट 1, संदीप शर्मा 1, रविचंद्रन अश्विन 3, युझवेंद्र चहल 1 ने राजस्थानकडून 1-1 बळी मिळवला. 222 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 201 धावाच करता आल्या. दिल्लीकडून खलील अहमद, मुकेश कुमार, कुलदीप यादव यांनी 2-2 तर अक्षर पटेल, रसिक दार सलाम यांना 1-1 विकेट मिळाली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)