IND vs PAK: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्माने पहिली प्रतिक्रीया दिली आहे. बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान (Pakistan vs India) सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावण्याची ही सलग 12 वी वेळ होती. जो एक विक्रम आहे. पाकिस्तानने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर पडलेल्या फखर झमानच्या जागी इमाम-उल-हकला संघात स्थान देण्यात आले आहे. तर बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर भारताचा राष्ट्रीय क्रिकेट संघ कोणताही बदल न करता पुढे गेला आहे. (IND vs PAK: पाकिस्तानच्या 'या' पाच खेळाडूंपासून सावध राहावे लागेल टीम इंडियाला; विजयात मोठा अडथळा ठरू शकतात)

नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)