Canada National Cricket Team vs Nepal National Cricket Team 1st T20I Tri-Series 2024 Highlights: काल 28 सप्टेंबर रोजी कॅनडा विरुद्ध नेपाळ यांच्यातील टी 20 आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिका 2024 चा पहिला सामना खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना किंग सिटीमधील मॅपल लीफ नॉर्थ-वेस्ट मैदानावर खेळला गेला. या सामन्यात कॅनडाच्या संघाने नेपाळचा 14 धावांनी पराभव केला आहे. पहिल्या T20 सामन्यात नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर कॅनडाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 123 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नेपाळ संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 36 धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर कर्णधार रोहित पौडेल आणि कुशल मल्ला यांनी मिळून डाव सांभाळला. नेपाळचा संपूर्ण संघ 19 षटकांत अवघ्या 109 धावांत गारद झाला. (हेही वाचा : IND vs BAN 2nd Day 3 Live Update: बोबंला! मैदानाच्या स्थितीवर अद्याप पंच खूश नाही, पुढील पाहणी होणार 12 वाजता)
सामन्याचे हायलाइट्स
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)