Bangladesh Beat India Asia Cup 2023: रोमहर्षक सामन्यात बांगलादेशने टीम इंडियाचा 6 धावांनी केला पराभव, शुभमन गिलचे शतक व्यर्थ
टीम इंडिया आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज आशिया कप 2023 चा (Asia Cup 2023) शेवटचा सुपर फोर सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने भारताचा सहा धावांनी पराभव केला.
टीम इंडिया आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज आशिया कप 2023 चा (Asia Cup 2023) शेवटचा सुपर फोर सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने भारताचा सहा धावांनी पराभव केला. तत्तपुर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राउंड-4 च्या शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये 5 बदल करण्यात आले होते. नाणेफेक हारल्यानंतर बांगलादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत आठ गडी गमावून 265 धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार शकीब अल हसनने सर्वाधिक 80 धावा केल्या. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 266 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी निघालेल्या टीम इंडियाची खराब सुरुवात झाली एकीकडे सगळे बाद होत असताना शुभमन गिलने एकाकी झुंज ठेवली आणि दमदार शतक ठोकले. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक तीन बळी घेतले.
ASIA CUP 2023. Bangladesh Won by 6 Run(s) https://t.co/OHhiRDZM6W #INDvBAN
— BCCI (@BCCI) September 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2023 11:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

