BAN vs SA 1st Test 2024 Day 3 Scorecard: बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका (SA vs BAN) संघातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ आज म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी ढाका येथे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने दुसऱ्या डावात 27.1 षटकात 3 गडी गमावून 101 धावा केल्या. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात लंच ब्रेकपर्यंत बांगलादेशने 201 धावा केल्या होत्या. त्यांनी 63 षटकात 6 गडी गमावले. यजमान संघ दक्षिण आफ्रिकेच्या 1 धावांनी पिछाडीवर आहे. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराज नाबाद 55 आणि झाकीर अली 30 धावांवर खेळत आहेत. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना कागिसो रबाडाने 4 आणि केशव महाराजने 2 बळी घेतले. (हेही वाचा:BAN vs SA 1st Test 2024 Day 3 Live Streaming: थोड्याच वेळात तिसऱ्या दिवसाचा खेळाला होणार सुरुवात, बांगलादेशने 3 विकेट गमावून केल्या 101 धावा; 'इथं' जाणून घ्या कुठे पाहणार लाइव्ह सामना )
बांगलादेशची धावसंख्या 6 विकेट्सवर 201 धावा
Dutch-Bangla Bank Bangladesh 🆚 South Africa Test Series 2024 | 1st Test
Day 03 | Lunch | Bangladesh trail by 1 run#BCB #Cricket #BANvSA #WTC25 #TestCricket pic.twitter.com/SZtqSS1obx
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)