AUS vs SL 5th T20I: अखेरच्या टी-20 मध्ये श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्स राखून विजय, मेंडिस ‘जादू’ने टाळला लाजिरवाणा व्हाईटवॉश
AUS vs SL 5th T20I: रविवारी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया श्रीलंकेवर क्लीन स्वीप करण्यात अपयशी ठरला. MCG येथे पाचव्या टी-20 सामन्यात विश्व T20 चॅम्पियन श्रीलंकेने 5 विकेट राखून पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने मालिका 4-1 ने जिंकली. पहिले फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाने 154/6 धावा केल्या. प्रत्युत्तरात कुसल मेंडिस आणि दासुन शनाका यांनी श्रीलंकेच्या पारड्यात विजय पाडला.
AUS vs SL 5th T20I: कुसल मेंडिस (Kusal Mendis) याच्या 58 चेंडूत नाबाद 69 धावांच्या जोरावर मालिकेतील अंतिम सामन्यात श्रीलंकेने (Sri Lanka) ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला.तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने (Australia) रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) श्रीलंकेविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात 6 बाद 154 धावा केल्या. पण मेंडिसच्या नाबाद खेळीने ऑस्ट्रेलियाच्या इराद्यावर पाणी फेरले आणि यजमान संघ पाच सामन्यांच्या T20I मालिकेत क्लीन स्वीप करण्यात अपयश ठरला.
It comes down to the final over but Sri Lanka hold their nerve to win the final T20I by 5 wickets 🎉
Australia take the #AUSvSL series 4-1. pic.twitter.com/673k9ZZN9x
— ICC (@ICC) February 20, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2022 03:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

