AUS vs ENG, Ashes 5th Test: ट्रॅव्हिस हेडच्या (Travis Head) शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने (Asutralia) शुक्रवारी होबार्ट (Hobart) येथे इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या अ‍ॅशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी सहा बाद 241 धावा केल्या. हेडने 113 चेंडूत 101 धावांची आक्रमक खेळी खेळून इंग्लंडला (England) या दिवस/रात्र कसोटी सामन्यात खराब सुरुवातीचा फायदा घेऊ दिला नाही. कॅमरून ग्रीननेही 74 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. हेड आणि ग्रीन यांनी पाचव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. टी-ब्रेकनंतर अर्ध्या तासानंतर पावसामुळे खेळ झाला नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)