आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या सुपर-12 मधील 34 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने (Australia Team) गोलंदाज आणि आरोन फिंच व डेविड वॉर्नरच्या सलामी जोडीच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर 6.2 षटकात 8 गडी राखून धमाकेदार विजय मिळवला. फिंचने 40 धावा तर वॉर्नरने 18 धावा केल्या. तसेच मिचेल मार्श 16 धावा करून नाबाद राहिला. अ‍ॅडम झाम्पा (Adam Zampa) आणि अन्य ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेश (Bangladesh) संघ 73 धावांवर ढेर झाला होता. या विजयासह कांगारू संघाच्या सेमीफायनलच्या आशा अजून पल्लवित आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)