IPL 2024 Opening Ceremony: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी दाखवली आपली जादू, तर सोनू निगम एआर रहमानने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध (Watch Video)

आयपीएलच्या 17व्या मोसमाचे उद्घाटन सोहळे सुरू आहेत. सगळ्यात आधी बॉलिवूड स्टार अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी आपली जादू दाखवली. या दोघांनी जय-जय शिवशंकर, देसी बॉईज, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी, बाला-बाला, हरे राम- हरे राम हरे कृष्णा हरे राम या गाण्यांवर डान्स केला.

IPL 2024 Opening Ceremony: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी दाखवली आपली जादू, तर सोनू निगम एआर रहमानने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध (Watch Video)

IPL 2024 Opening Ceremony: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) आजपासून सुरू होत आहे. आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (CSK vs RCB) यांच्यात सामना खेळवला जात आहे. यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. दरम्यान, आयपीएलच्या 17व्या मोसमाचे उद्घाटन सोहळे सुरू आहेत. सगळ्यात आधी बॉलिवूड स्टार अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी आपली जादू दाखवली. या दोघांनी जय-जय शिवशंकर, देसी बॉईज, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी, बाला-बाला, हरे राम- हरे राम हरे कृष्णा हरे राम या गाण्यांवर डान्स केला. संपूर्ण स्टेडियम खचाखच भरले आहे. अक्षय आणि टायगरने एकामागून एक डान्स केला. टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारनंतर सोनू निगम मंचावर आले. सोनू निगमने वंदे मातरम गाऊन करोडो भारतीयांची मने जिंकली. सोनू निगमसोबत एआर रहमान आणि मोहित चौहान यांनीही आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. दोन्ही गायकांना रसिकांची भरभरून साथ लाभली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 22, 2024 08:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).