भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप 2023 (Asia Cup 2023) ची अंतिम फेरी जिंकून आठव्यांदा विजेतेपद पटकावले. आगामी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी हा विजय सर्व भारतीय खेळाडूंसाठी मोठा दिलासा मानला जाऊ शकतो. विजेतेपदाच्या लढतीतील विजयानंतर भारतीय खेळाडूही मैदानावर खूप आनंदी दिसले. यादरम्यान इशान किशनचा (Ishan Kishan) एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो विराट कोहलीच्या चालण्याची शैली कॉपी करत आहे. विराट कोहलीशिवाय इशान किशनसोबत श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शुभमन गिल आणि मोहम्मद सिराजही मैदानावर होते. ईशानने विराटच्या चालण्याच्या पद्धतीची अतिशय सुंदर नक्कल केली. यानंतर कोहलीही उत्तर देण्यात मागे राहिला नाही आणि त्यानेही लगेच इशानच्या चालण्याची नक्कल केली. यावेळी तिथे उपस्थित टीम इंडियाचे इतर खेळाडू हसताना दिसले.
Ishan Kishan doing a Virat walk - Virat Kohli with the counter 😂😂#AsiaCup23 pic.twitter.com/u57DWmmJ7L
— रोहित जुगलान Rohit Juglan (@rohitjuglan) September 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)