रविवार, 23 जून रोजी, अफगाणिस्तान क्रिकेट संघाने ICC T20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलियन  क्रिकेट संघावर 50 धावांनी शानदार विजय मिळवला. अफगाणिस्तान क्रिकेट संघाने कांगारू संघाला 149 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ 127 धावांवर गडगडला. विजयासाठी अवघ्या 149 धावांचा बचाव करताना, गुलबदिन नायबने त्याची सर्वात शानदार कामगिरी केली. ज्यात त्याने केवळ 20 धावा देत चार विकेट घेतल्या. तर नवीन-उल-हकने 4 षटकांत 20 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय रहमानउल्ला गुरबाज 60 (49) आणि इब्राहिम झद्रान 51 (48) यांनी फलंदाजीत अर्धशतके झळकावली.

दरम्यान, सामना संपल्यानंतर खेळाडूंनी टीम बसमध्ये आनंद साजरा केला आणि लोकप्रिय गाण्यावर डान्स केला. जो संघाच्या गोलंदाजी सल्लागार ब्राव्होने तयार केले होते. या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohammad Nabi (@mohammadnabi07)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)