Asian Games 2023: अफगाणिस्तानने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा (AFG Beat PAK) 4 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत स्थान पक्के केले असून सुवर्णपदकाच्या लढतीत भारतासोबतची लढत निश्चित केली आहे. शुक्रवारी (6 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला 115 धावांत गुंडाळल्यानंतर 13 चेंडू शिल्लक असताना विजयाचे लक्ष्य गाठले. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदिन नायबने 19 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 26 धावांची नाबाद खेळी खेळली आणि आमेर जमेलच्या 18व्या षटकात 2 षटकार आणि 2 चौकार मारून अफगाणिस्तानला संस्मरणीय विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानकडून नूर अली जद्रानने सर्वाधिक 39 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)